एक्सप्रेस वेवरील दरड हटवण्याचे काम आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून प्रवाशांनी जुन्या मुंबई - पुणे महामार्ग व अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याची यंदाची ही दुसरी घटना देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या या एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने मुंबई व पुणे अशा दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या.
आडोशी बोगद्याजवळ गाडीवर दरड कोसळल्याने दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर तीन महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या आहेत.
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी सकाळी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.