ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - लवकरच सुरू होणा-या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्यात येणार असल्याने १५ व १६ जून रोजी एक्स्प्रेस वे बंद राहणार आहे.
दुपारी १२ वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होणार असून दोन्ही दिवशी १५-१५ मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळेत एक्सप्रेस हाईवे वरील वाहतूक पूर्णतः बंद राहील.