गेले तीन दिवस मुंबई, ठाणे, कोकणासह महाराष्ट्राच्या अनेक भागात धो-धो पाऊस कोसळतोय. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर खरं तर मनमोहक सरीवर सरी - श्रावणसरी सुरू होतात, पण यावेळी तर मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक धरणं 'फुल्ल' झाली आहेत, नद्यांना पूर आले आहेत, शहरांमध्ये-गावांमध्ये पाणी शिरतंय, अनेकांचे संसार वाहून जात आहेत. मुंबईची लाईफलाईन ठप्प झालीय. अनेक रस्ते बंद झालेत. जनजीवन पार विस्कळीत होऊन गेलंय. स्वाभाविकच, वरुणराजाने आता थोडी विश्रांती घ्यावी, असं सगळ्यांनाच वाटतंय. परंतु, त्यासाठी आणखी किमान 24 तास वाट पाहावी लागेल, असं हवामान खात्यानं सूचित केलं आहे.
पुढचे 24 तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरचा पाऊस हळूहळू कमी होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
'हवामान खात्याचे अंदाज' हा खरं तर आपल्याकडे विनोदाचा विषय झाला होता. परंतु, यावेळी त्यांनी वर्तवलेले बहुतांश अंदाज अचूक ठरले आहेत. मग तो 26 जुलैचा असेल किंवा गेल्या तीन-चार दिवसांचा. रात्री न झोपता आणि दिवसा न थांबता पाऊस पडत असल्याचं आपण सगळेच पाहतोय. परंतु, 24 तासांनंतर ही परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि सूर्यदर्शनही होईल, असं मानायला हरकत नाही.
डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये पुराचं पाणी
नाशिकमधील शाळांना सोमवारी सुटी
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, पाण्याचा वेग पाहून भीती वाटेल
कामशेतमध्ये पुरात अडकलेल्या गायीला NDRF टीमनं वाचवलं
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूर परिस्थिती