मुंबईः मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. त्यामुळे कधीही न थांबणा-या मुंबईची गतीही काहीशी मंदावली आहे. रस्त्यांपासून रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.अशातच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरच्या ब-याचशा लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या मार्गात बदल केले गेले आहेत. 22106 पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस रद्द केली आहे. 22105 मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसही रद्द केली आहे. तर उद्या धावणारी 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच आज आणि उद्या धावणारी 51317/51318 पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 11026 पुणे-भुसावळ या ट्रेनच्या मार्गात बदल करून ती दौंड-मनमाडमार्गे वळवली आहे.तर 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ ट्रेनही मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा- भोपाळ मार्गे वळवली आहे. तुतिकोरीन-ओखा विवेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करून ती इगतपुरी-मनमाड-जळगावमार्गे वळवली आहे. यशवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्स्प्रेसही इगतपुरी-भुसावळ- खांडवा- भोपाळ- रतलाम- बेराच मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
रूळ पाण्याखाली, रेल्वे कोलमडली; अनेक गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 3:45 PM