ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - ओला ऊबेर या खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, यामागणीसाठी आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक व मालकांच्या दोन युनियनने पुकारलेल्यासंपावरून संघटनांमध्येच जुंपली आहे. संप पुकारलेल्या दोन्हीयुनियनविरोधात इतर संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना करत संपालाकडाडून विरोध केला आहे. टॅक्सी-रिक्षा चालक-मालक संयुक्त संघर्ष समितीनेशुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.संघर्ष समितीचे निमंत्रक उदय आंबोणकर म्हणाले की, सण तोंडावर असतानामुंबईकरांना वेठीस धरणे चूकीचे आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंतमुख्यमंत्र्यांनी चर्चा झाली नाही, तरच आंदोलन करण्याची भूमिका कृतीसमितीने घेतली आहे. काही संघटनांनी २९ आणि ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाकदिली आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबईकरांना कोणताही त्रासदेणार नाही. शिवाय संप पुकारणाºया संघटनांचा कोणताही त्रास इतर सभासदरिक्षा आणि टॅक्सी चालकांना होऊ नये, म्हणून संरक्षण देण्याची जबाबदारीहीसंघर्ष समितीने घेतली आहे. संघर्ष समितीमध्ये शिवसंग्राम टॅक्सी व रिक्षायुनियनसोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, भारतीय टॅक्सी चालक संघ,मुंबई टॅक्सी चालक मालक सेना या प्रमुख संघटनांसह इतर ५ संघटनांचा समावेशअसल्याचे आंबोणकर यांनी सांगितले. .मुंबई टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष निलेश चव्हाण म्हणाले की, शिवसेनासत्तेत असली, तरी टॅक्सी चालकांसाठी युनियनने सरकारविरोधात न्यायालयातधाव घेतली आहे. सिटी टॅक्सी स्किम लागू होत नाही, तोपर्यंत बेकायदेशीरपणेचालविण्यात येणाºया ओला व उबेरच्या कंपन्या व त्यांच्या गाड्यांवर तत्काळबंदी घालावी. शासनाने पुढाकार घेऊन स्वत: अॅफ तयार करावे. शिवाय रिक्षाव टॅक्सी चालकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी काढावा. अग्रीगेटरसोबतरिक्षा व टॅक्सी चालक-मालक स्पर्धेत उतरायला तयार असून नियमांप्रमाणेस्पर्धा व्हावी, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.