ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबईतील रस्ते घोटाळ्याप्रकरणी दहा लेखा परिक्षकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंतची ही मोठी कारवाई असल्याचे समजते.
मुंबई महानगर पालिकेतील नालेसफाई पाठोपाठ रस्ते घोटाळा प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी एकूण दहा लेखा परिक्षकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी रस्ते घोटाळ्याप्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी रेलकॉन आर.के.मधानी, आर.के.मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, जे.कुमार के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आरपीएसकेआर कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच, रस्ते विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता अशोक पवार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते.