शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

Maharashtra Restrictions: मुंबई-ठाण्यातील शाळा बंद; राज्याबाबत मात्र निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 6:40 AM

corona Virus in Maharashtra: राज्यातील अन्य शहरांमधील शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही वाढत असल्याने खबरदारी म्हणून दहावी-बारावीचे वर्ग वगळून, पहिली ते नववी आणि अकरावीच्या सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. ठाणे महापालिकेनेही शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील अन्य शहरांमधील शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवत असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी जाहीर केले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील, नवी मुंबइतील शाळाही ३१ पर्यंत बंद राहतील. रायगडमध्ये रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. 

उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजगेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींच्या प्रशासकीय समितीने जानेवारी अखेरपर्यंत किंवा पुढील आदेश देईपर्यंत न्यायालयीन कामकाज आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात निर्बंध कडक होणारn पुणे शहरात २७ डिसेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. बधितांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतलेले आहेत. या बाधितांमध्ये अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. n त्यामुळे  शहरात निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक होत आहे..

ठाणे जिल्ह्यातील २९४९ शाळा राहणार बंदn गेल्या आठवड्यात शंभरच्या घरात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या जानेवारीत एकदम दोन हजारच्या घरात गेल्याने धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील एक हजार ६२० माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ प्राथमिक शाळा अशा दोन हजार ८४८ शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी घेतला. n यामुळे जिल्ह्यातील तब्बल सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे.

महापालिकांची खबरदारीn राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिका क्षेत्रात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. n शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटले असताना मुंबईतील कोरोना रुग्ण आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

n ही रुग्णवाढ होताना लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 

स्थानिक पातळीवर संक्रमणाची परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आधीच देण्यात आले आहेत.     - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस