ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत तब्बल ९० घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या नीलेश उर्फ डॉन गुजर (रा. कोपरी, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचे १८ तोळे सोने हस्तगत केले असून, ते संबंधित फिर्यादी विश्वेश कवडी यांना नौपाडा पोलिसांनी शनिवारी हस्तांतरित केले.नौपाड्यातील, हिंदू कॉलनी येथील रहिवासी विश्वेश कवडी यांच्या घरात चोरी झाली. ही चोरी विश्वेशनेच केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, हवालदार महेश भोसले यांना मिळाली होती. त्याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-३ च्या पथकाने अलीकडेच अटक केली. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी न्यायालयामार्फत मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा मिळवला. त्याच्याकडून दागिने हस्तगत करण्यात आले. दागिने न्यायालयीन प्रक्रियेनंतर नौपाडा पोलिसांनी फिर्यादी कवडी यांना सुपुर्द केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.
मुंबई-ठाण्यात ९० घरफोड्या करणारा अटकेत
By admin | Published: January 30, 2017 4:13 AM