शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

मुंबई विद्यापीठाचा 'निकाल' लागणार?, सव्वातीन लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 7:37 AM

मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

मुंबई, दि. 31 -  मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के  मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. पण ३० जुलैच्या रात्रीपर्यंत विद्यापीठाने केवळ १५३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्याने तब्बल ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. 

तसेच सव्वातीन लाख उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत. आतापर्यंत विद्यापीठाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. पण आता एका दिवसात सव्वातीन लाख उत्तरपत्रिका तपासून ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करणे हे अशक्यप्रायच असल्याने मुंबई विद्यापीठाला देण्यात आलेली डेडलाइन चुकल्याचेच स्पष्ट होत आहे. 

विद्यापीठाने प्राध्यापकांना रविवारीही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी बोलावले होते. पण रविवार असल्यामुळे जवळपास ५ हजारांपैकी फक्त ९३९ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीला आले. प्राध्यापकांची संख्या रोडावल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा वेग रविवारी मंदावला होता. फक्त २४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी रविवारी पूर्ण झाली. त्यामुळे अजूनही सुमारे ३ लाख २५ हजार १९५ उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे. १ लाख २५ हजार ३५७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही अजून झालेले नाही.

तपासणी बाकी असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये २ लाख ६३ हजार ८१५ उत्तरपत्रिका या वाणिज्य शाखेच्या असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच विधिचा निकालही लागलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ सांगत असूनही रविवारी रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. निकालाच्या डेडलाइनला शेवटचे दोन दिवस उरले असताना, शनिवार आणि रविवारी मिळून फक्त छोट्या अभ्यासक्रमांचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे लाखो विद्यार्थी तणावाखाली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अतिआत्मविश्वासाने ३१ जुलै रोजी निकाल जाहीर करू, अशी घोषणा केली आहे. मात्र निकालाची सद्य:स्थिती पाहता हे सर्व निकाल सोमवार, ३१ जुलैला जाहीर होतील, अशी शक्यता दिसत नाही. मात्र हे निकाल सोमवारी जाहीर झाले नाहीत तर १ ऑगस्ट रोजी अधिवेशनात शिक्षणमंत्री तावडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले.

इतक्या उत्तरपत्रिकातपासणीचे आव्हानवाणिज्यमूल्यांकन - २,६३,८१५मॉडरेशन - ९७,३०१

विधिमूल्यांकन - ३१,१४३मॉडरेशन - ५,६२३

कलामूल्यांकन - २१,०९७मॉडरेशन - १०,९१०

मॅनेजमेंटमूल्यांकन - १,४८१मॉडरेशन - ७,१९५

विज्ञानमूल्यांकन - ४,०२३मॉडरेशन - २,०३७

टेक्निकलमूल्यांकन - ३,६३६मॉडरेशन - २,२९१