शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

मुंबई, ठाण्याला कोयनेचे पाणी!

By admin | Published: September 16, 2015 3:36 AM

कोयना धरणातल्या वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्रात वाया जाणाऱ्या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे.

नवी दिल्ली : कोयना धरणातल्या वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्रात वाया जाणाऱ्या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे. वीजनिर्मितीनंतर वाया जाणारे पाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, सिडको व कोकणातील वाटेवरच्या गावांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या तब्बल सव्वादोन हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मंगळवारी तत्त्वत: मान्यता दिली. कोयना टेल रेस ते मुंबई जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासही केंद्र शासनाच्या उच्च अधिकारप्राप्त समितीच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी मिळाली. सदर योजनेसाठी धरणातले किंचितही पाणी वापरले जाणार नसून, केवळ समुद्रात वाहून वाया जाणाऱ्या पाण्यापुरता मर्यादित असा हा प्रकल्प आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पत्रकारांना दिली.या योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने त्याचा जोरदार पाठपुरावा करण्याचे ठरवले. सदर योजनेचा प्रकल्पपूर्व लाभहानी अहवाल (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आला आहे. हा अहवाल अतिशय उत्साहवर्धक असून, प्रकल्पखर्च व त्यातून होणाऱ्या लाभाचा (कॉस्ट बेनिफिट) रेशो १.८९ टक्के आहे. (हा रेशो १ टक्क्यापेक्षा अधिक असल्यास प्रकल्प लाभदायक मानला जातो.) याखेरीज प्रकल्पाच्या अंतर्गत परताव्याची टक्केवारी (इंटर्नल रेट आॅफ रिटर्न) १८.८९ टक्के आहे. सरकारी नियमानुसार या टक्केवारीचा किमान मापदंड ११ टक्के आहे. त्यापेक्षा अधिक लाभ होत असल्यास प्रकल्पाचा अग्रक्रमाने विचार व्हावा, अशी मान्यता देण्यास सरकारची हरकत नसते. या मापदंडानुसार कोयनेचे पाणी वापरण्याच्या प्रकल्पास तत्त्वत: मान्यता देण्याची झटपट तयारी केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांनी दर्शविली. राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट बोर्डाने) कोयना टेल रेस ते मुंबई जोड प्रकल्पासाठी २,२३८ कोटी रुपये खर्चाचा अंदाज केला आहे. त्यात थोडीफार वाढ होऊ शकेल, असे स्पष्ट करताना शिवतारे म्हणाले की, सदर प्रकल्पाच्या निमित्ताने नॅशनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रादेशिक जलसिंचन योजनांच्या नैना प्रकल्पांनाही लाभ होणार आहे. अर्थात तमाम उपसा जलसिंचन योजनांसाठी वापरावा लागणारा वीजपुरवठा, योजनेची दैनंदिन देखभाल व कार्यवाही यासाठी येणाऱ्या खर्चाचा भार सरकारने उचलायला हवा; अन्यथा देशभरातील हजारो कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांसाठी केलेला खर्च वाया जाईल, अशी भीतीही शिवतारेंनी बोलून दाखवली.केंद्रीय जलसंपदा मंत्री उमाभारती यांनी जलसंपदा विभागातर्फे राजधानीतील विज्ञान भवनात नदीजोड प्रकल्पासंबंधी ६व्या बैठकीचे आयोजन केले होते. राज्यमंत्री शिवतारेंसह राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई व मुख्य अभियंता सहसचिव राजेंद्र पानसे त्यास उपस्थित होते.पाणीप्रश्न सुटणारकोयना धरणातले ६७.५ टीएमसी पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. आजमितीला इतके पाणी अडवण्यासाठी धरण बांधायचे ठरले तर १५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागेल. त्यापेक्षा वाया जाणारे पाणी मुंबईपर्यंत आणण्यासाठी काही ठिकाणी पाणी उचलावे लागेल. त्यासाठी अवघी ६६ मेगावॅट वीज खर्च होईल. तथापि वाया जाणाऱ्या या पाण्याचा लाभ मुंबईसह आसपासच्या परिसराला होऊ शकतो. त्यातून एमएमआरडीए क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न दीर्घकाळासाठी सुटू शकतो.