शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जगातील सर्वात लठ्ठ महिला सर्जरीसाठी उद्या येणार मुंबईत

By admin | Published: February 10, 2017 12:25 PM

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचे वजन 500 किलो आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचे वजन 500 किलो आहे. अति लठ्ठपणामुळे गेल्या काही वर्षांपासून बिछान्याला खिळून असलेल्या इमान वजन कमी करणा-या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येत आहेत. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. 
 
इजिप्तमध्ये राहणा-या इमान यांना एअरबसच्या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. इमाम यांच्या शरीराचे आकारमान आणि वजनामुळे त्यांना घेऊन येण्यासाठी विमानामध्येही काही बदल करण्यात आले आहेत. इजिप्तच्या अलेक्झॅन्ड्रिया अल अरब आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास विमानाचे मुंबईत लँडीग होईल. 
 
इमान यांना प्रवासी विमानातून आणणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी मालवाहतूक विमानाचा  वापर करण्यात येईल. या शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड बांधण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे.इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे. 
मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष टीम उपस्थित राहणार असून ऑपरेशन झाल्यानंतरदेखील 24 तासांसाठी त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तिला बोलता येत नाही, तिला टाईप-2 डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्चरक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे. शस्त्रक्रियेनंतर इमामला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली इथेच रहावे लागेल.