कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून पुकारलेल्या दूध संकलन व वाहतूक बंदचा मुंबईला फटका बसणार नाही, याची तजवीज दूध संघांनी केली आहे. त्यांनी दोन दिवस आधीच दुधाची मुंबईला होणारी वाहतूक वाढविली असून, किमान दोन दिवस दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात सरकारने प्रति लीटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध संकलन व दूध वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे.मुंबई व पुणे येथे रोज एक कोटी लीटर दुधाची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा ‘अमूल’चा असून, त्यानंतर‘गोकुळ’ ‘वारणा’व इतर संघांचा आहे. आंदोलन ताणले, तर किमान दोन दिवस दूधटंचाई भासणार नाही, याची दक्षता संघांनी घेतली आहे.>दृष्टीक्षेपात विक्रीएकूण विक्री :एक कोटी लीटरराज्य दूध संघाकडून : ६० लाख लीटरइतर दूध संघ :४० लाख लीटर
मुंबईला दूधटंचाई भासणार नाही; पुरवठ्यात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:38 AM