मुंबई : मुंबईची आर्द्रता शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही ९४ टक्के एवढी नोंदविण्यात आली असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आहे. अशाच काहीशा बदलत्या तापमानामुळे मुंबईकरांचा ‘ताप’ वाढतच असून, उकाड्याने मुंबईकर त्रासले आहेत. त्यातच रविवारसह सोमवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामान अंशत: ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडेच्७ ते ९ - विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.च्१० एप्रिल - मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.शनिवारचे शहरांचे कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४२.६, अमरावती ४३.२, औरंगाबाद ३९.८, बीड ४१.५, बुलडाणा ३९.८, चंद्रपूर ४३, गोंदिया ४०.४, जेऊर ४१, मालेगाव ४१.२, सातांक्रूझ ३३, नागपूर ४३, नांदेड ४२.५, उस्मानाबाद ३८.६, परभणी ४२.९, पुणे ३९.१, सांगली ३९.२, सातारा ३८.७, सोलापूर ४०.९, वर्धा ४३.४, यवतमाळ ४१.५