शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुंबईकर गाफील!

By admin | Published: July 10, 2015 4:14 AM

जागरूकता हरवली : दहशतवादी कुठेही ठेवू शकतील बॉम्ब

टीम लोकमत, मुंबईमुंबईतली दीड कोटी जनता पोलिसांचे कान, नाक, डोळे बनली तर दहशतवादविरोधी लढ्यात मुंबईला कोणीही पराजित करू शकणार नाही. सदैव जागरूक असलेल्या नागरिकांमुळे दहशतवादी हल्ले थोपवता येतील, या दिशेने पोलीस, दहशतवादविरोधी पथक सातत्याने जनजागृती करीत आहे. प्रत्यक्षात त्याचा मुंबईकरांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनमध्ये मुंबईकर स्वत:च्याच धुंदीत वावरताना दिसून आले. या स्टिंग आॅपरेशनमधून मुंबईकर गाफील असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या स्टिंगनंतर पोलिसांचे कान, नाक, डोळे असलेले मुंबईकर बधिर असल्याचे स्पष्ट झाले.७/११ बॉम्बस्फोट मालिकेला शनिवारी ९ वर्षे पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हे स्टिंग आॅपरेशन करून मुंबईकर किती सतर्क, संवेदनशील आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’चे आठ प्रतिनिधी चार गटांमध्ये संशयास्पद जाणवतील असे खोके, सॅक, पिशव्या घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट स्थानकावर आले. सोबतच्या खोके, पिशव्यांमध्ये प्रेशर कुकर व अन्य धातूच्या वस्तू होत्या. स्थानकावर प्रवेश करताना सर्वच प्रतिनिधी मेटल डिटेक्टरमधून गेले. चर्चगेटवरल्या डिटेक्टरनी किमान कू-कू असा आवाजतरी केला. मात्र सीएसटीवरचे डिटेक्टर तर मुकेच होते. ते जणू शोभेसाठी लावले असावेत, असे वाटले. रिपोर्टर्सचे हे चारही गट अत्यंत आरामात, विनारोकटोक चर्चगेट, सीएसटीवरून लोकलमध्ये चढले. दोन गटांनी सीएसटी ते दादरपर्यंत फर्स्ट क्लासमधून (जेन्टस आणि लेडिज) प्रवास केला. तर अन्य गटांनी सीएसटी ते कॉटन ग्रीन, चर्चगेट ते महालक्ष्मी असा प्रवास केला. प्रत्येक गटातल्या एका प्रतिनिधीने आपापली बॅग, खोके, पिशवी रॅकवर ठेवली. आसपासच्या प्रवाशांना ही वस्तू माझी आहे, याची खात्री करून दिली. काही स्थानकांनंतर ती वस्तू रॅकवर तशीच ठेवून सर्वांसमोरून तो रिपोर्टर लोकलमधून सरळ उतरून गेला. मात्र कोणाही प्रवाशाच्या तोंडावरची माशी हलली नाही. ना कोणी संशय व्यक्त केला. जो-तो आपल्या मोबाइलमध्ये नाक खुपसून बसलेला होता. कोणी लोकलमध्ये चढल्या-चढल्याच ढाराढूर निद्रिस्त झाले. तर काही खिडकीतून बाहेर बघण्यात मश्गुल होते. पुढे दोन ते तीन स्थानके गेल्यानंतर त्याच डब्यात बसलेले ‘लोकमत’चे दुसरे प्रतिनिधी आधी ठेवलेल्या वस्तू घेऊन लोकलबाहेर पडले. त्या वेळीदेखील कोणीही त्यांना हटकले नाही. ७/११ बॉम्बस्फोट मालिकेत सात लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. चर्चगेटला लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात बॉम्ब घेऊन चढलेले अतिरेकी मध्येच अशाच प्रकारे गायब झाले होते. तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याच लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्यांनी वरखाली पाहण्याची साधी तसदीही घेतली नव्हती.