मुंबई : सोमवारी मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमान १९.८ अंश नोंदविण्यात आले आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात कमालीचा गारठा जाणवायला लागला आहे. तसेच, सोमवारपासून मुंबईत थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची सकाळ थंडा थंडा कूल कूलनेसुरू होते.गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, १७ ते २० डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येच्पुणे-१५.६, च्जळगाव - १७.६च्महाबळेश्वर - १४.५च्नाशिक-१६.०, च्सातारा-१५.८च्उस्मानाबाद - १३.९च्औरंगाबाद - १५.७च्नागपूर-१६.५ च्वाशिम-१५.८च्यवतमाळ - १७.०