शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुंबईकरांच्या तक्रारी यायला नकोत!

By admin | Published: June 18, 2017 1:09 AM

महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवित, मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबते, हे दरवर्षीचे चित्र. मात्र, या वेळी सेनेचे पहारेकरी बारीक लक्ष ठेवून आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवित, मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबते, हे दरवर्षीचे चित्र. मात्र, या वेळी सेनेचे पहारेकरी बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशी सक्त ताकीद ‘मातोश्री’ बंगल्यावर शनिवारी सकाळी पार पडलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, शिवसेना पक्षप्रमुखांनी सर्व नगरसेवकांना दिली आहे. गेल्या सोमवारी मान्सूनपूर्व पावसानेच काही भागांमध्ये पाणी तुंबले होते. किंग्ज सर्कल, माटुंगा आणि दादर या भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणी पालिकेने संचालक (अभियांत्रिकी) लक्ष्मण व्हटकर यांना नोटीस बजावली आहे. मात्र, ठाकरे यांनीही नगरसेवकांना आपापल्या प्रभागात सतर्क राहण्याचे आदेश या बैठकीतून देत, सर्वच नगरसेवकांची झाडाझडती घेतली. युती तोडून स्वबळावर महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतरही भाजपाचे सत्तेचे गणित फसले. मात्र, सत्ताधारी शिवसेनेच्या नाकात दम आणण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. पहारेकऱ्याच्या भूमिकेत काम करणाऱ्या भाजपाने नालेसफाईवरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास भाजपाला आयती संधी मिळणार असल्याने, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. याचे पडसाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ बंगल्यावर बोलाविलेल्या शनिवारच्या नगरसेवकांच्या बैठकीत उमटले.उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतली. गेल्या सोमवारी मान्सूनपूर्व पावसानेच काही भागांमध्ये पाणी तुंबले होते. किंग्ज सर्कल, माटुंगा आणि दादर या भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणी पालिकेने संचालक (अभियांत्रिकी) लक्ष्मण व्हटकर यांना नोटीस बजावली आहे. मात्र, ठाकरे यांनीही नगरसेवकांना आपापल्या प्रभागात सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत.विकास आराखड्याचा अभ्यास करा...मुंबईचा विकास आराखडा गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या आराखड्याच्या मसुद्यावर अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, पहिला आराखडा स्थगिती होऊन सुधारित आराखडा सादर होऊनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी दोनदा मुदत वाढवून घेतली, परंतु अभ्यास केलाच नाही. याचीही ठाकरे यांनी दखल घेत, विकास आराखड्याचा अभ्यास करा, चर्चा करा आणि सभागृह नेत्यांमार्फत सूचना मांडा, असे आदेश दिले.टोलवरून कानउघडणी...राज्यातील सर्व टोल नाक्यांवर नगरसेवकांच्या वाहनांना विनामूल्य प्रवेश देण्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे नगररसेवक तुकाराम पाटील यांनी केली होती. मात्र, याचे सर्वत्र पडसाद उमटून शिवसेनेचे हसे झाले. या प्रकरणी ठाकरे यांनी शनिवारी नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी केली. ठरावाच्या सूचना थेट पालिकेच्या चिटणीस खात्याकडे देण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करा, सभागृह नेते यशवंत जाधव यांना दाखवा, असे पक्षप्रमुखांनी नगरसेवकांना बजावले.