मुंबई : तापमानातील चढ-उतार आणि अवकाळी पाऊस; अशा दुहेरी वातावरणाचा राज्याला फटका बसत असून, पुढील ७२ तासांसाठी मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३१ अंश इतके नोंदविण्यात आले आहे. पुढील ४८ तासांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किमान तापमानातही घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)राज्यासाठी अंदाज१६ आणि १७ मार्च : मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१८ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१९ मार्च : राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईसाठी अंदाज१६ आणि १७ मार्च : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशाच्या आसपास राहील.
मुंबईकरांना उन्हाचा तडाखा कायम
By admin | Published: March 16, 2016 8:37 AM