पुणे : मुंबईच्या एका व्यावसायिकाने सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये हातापायाच्या नसा कापून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. अतुल रनसोदल काबरा (५०, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काबरा हे सोमवारपासून आश्रय लॉजमध्ये १०६ क्रमांकाच्या खोलीमध्ये उतरले होते. त्यांनी भरलेले चार हजार रुपयांचे भाडे बुधवारपर्यंतच्या भाड्यात जमा झाल्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी काबरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी पायाच्या व हाताच्या नसा कापलेल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेली सुसाईड नोट व मोबाईल ताब्यात घेतला. घरी वाद झाल्यामुळे चार दिवसांपूर्वी पुण्यात निघून आलेल्या काबरा यांच्या मिसिंगची तक्रार कुटुंबियांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल केलेली आहे. त्यांचा शोध घेत घेत नातेवाईक पुण्यात आले होते. परंतु त्यापुर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. कर्जफेडीच्या चिंतेने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या व्यावसायिकाची पुण्यात आत्महत्या
By admin | Published: November 19, 2015 1:42 AM