शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

Property Tax Waiver: मुंबईचा निर्णय, राज्यातील अन्य महापालिकांना पावणार? मालमत्ता कर रद्द करण्यासाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 6:32 AM

Property Tax Waiver in Other Municipal corporations:  सर्वच महापालिकांमध्ये मालमत्ता कर रद्द करण्यासाठी दबाव. मुंबईप्रमाणेच लाभ देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर सर्वच महापालिकांमध्ये हा कर रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. 

विशेषत: आगामी १० महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मालमत्ता यासाठी सरसावले आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊनने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बुडाले. सर्वसामान्यांचे उत्पन्न घटले असताना किमान मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. मुंबई महापालिका हद्दीतील सुमारे १६ लाख घरांना या निर्णयाचा फायदा होईल. महापालिकेला सुमारे ४६२ कोटी महसूल कमी मिळेल. यावर २०१७ साली दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, देर आए दुरुस्त आए, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

नाशिकमध्ये तयारीनाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कर रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी सोमवारी आयुक्तांना पत्र देऊन महासभेत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देणार आहेत. 

ठाण्याचा निर्णय शासन दरबारीठाण्यातही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव नोव्हेंबर २०२१ मध्ये महासभेत मंजूर झाला. डिसेंबरमध्ये तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

राजकीय पक्षही सरसावलेपुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, जळगाव, अहमदनगर, धुळे आदी महापालिकांमध्येही कर रद्द करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.   

टॅग्स :Electionनिवडणूक