शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईच्या निकालाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:48 AM

बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा एका टक्क्याने घटली आहे. यंदा मुंबईचा निकाल ८७.४४ टक्के लागला आहे.

मुंबई : बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा एका टक्क्याने घटली आहे. यंदा मुंबईचा निकाल ८७.४४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८८.२१ टक्के इतका होता. राज्याच्या निकालात मुंबई चौथ्या क्रमांकावर गेली आहे.मुंबईतून एकूण ३ लाख ११ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २लाख ७२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ३८ हजार २१४ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे. यामध्ये ९० टक्कयांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार २८८ इतकी आहे. पुनर्परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा टक्का ही यंदा घसरला आहे. मागील वर्षी तो ४४. २६ टक्के इतका होता, तर यंदा तो ३७.१३ टक्के इतकाच लागला आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि खासगीरीत्या परीक्षा देण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबईच्या एकूण निकालाला फटका बसला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.मात्र, विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. विज्ञान शाखेच्या निकालात १ टक्क्याने वाढ झाली आहे. कला शाखेच्या निकालात २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत असून, वाणिज्य शाखेच्या निकालातही १ टक्क्यांची घसरण झाली आहे. व्होकेशनलचा निकाल यंदा ८९. १५ टक्के इतका लागला आहे.मुंबईच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ती अव्वल आलेल्या कोकण विभागापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. कोकणातील एकूण विद्यार्थींसंख्या ही मुंबईतील खाजगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या आसपास आहे. खासगीरित्या प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. ऐनवेळी परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या ही मुंबई विभागात मोठी असते. त्यामुळे मुंबईच्या निकालाचा टक्का घसरला असल्याची माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ सुभाष बोरसे यांनी दिली.३०६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केमुंबईतील तब्बल ३०६ महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला असल्याची माहिती ही विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. शहरातील ३ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.यंदा तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र तरीही मंडळाला बारावीचा निकाल वेळेवर लावण्यात मिळाले आहे. त्याचसोबत कॉपी प्रकरणांना आळा घालण्यातही मंडळाने चांगली कामगिरी बजावली आहे.बारावी परीक्षेत यंदा पहिल्यांदाच उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांच्या सर्व पानांवर बारकोडची छपाई करण्यात आली होती.यंदा प्रथमच पुणे विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातून बारावीची परीक्षा देणाºया सर्व विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर आॅनलाइन हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात आले होते.माहिती तंत्रज्ञान (विज्ञान, कला व वाणिज्य) व सामान्य ज्ञान (सैनिकी शाळा) या विषयांची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एका दिवसाचा खंड ठेवण्यात आला.प्रश्नपत्रिकेचे वाचन करून आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात आली.दोन हजार महाविद्यालये शंभर नंबरीपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेघेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत २ हजार ३०१ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, तर ४८ महाविद्यालयांना भोपळाही फोडता आलेला नाही. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर वकोकण या ९ विभागांमधून १४लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.यामध्ये राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९५.८५, कला शाखेचा ७८.९३, वाणिज्य शाखेचा ८९.५० तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८८.४१ टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकाल लागणाºया महाविद्यालयांची संख्या मोठी असून, विज्ञान शाखेत पुणे विभागातील ३०८, कला शाखेत औरंगबादमधील ५६, वाणिज्य शाखेत पुन्हा पुणे विभागातील १२७ तर व्यावसायिक अभ्यासक्रमात मुंबई विभागातील १५ महाविद्यालयांचा समावेश होतो.डिसेंबर महिन्यापासून अभ्यासाला सुरुवात केली. त्याचे फलीत झाले व ७९़३८ टक्के मिळाले़ तसेच प्रत्येक विषयासाठी एक ते दीड तास वेळ देत होतो. आता पुढे बीए व एलएलबीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. - फैजाल अन्वर रिझवान खान, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, चेंबूर. पुढील शिक्षणात मला कॉमर्स शाखेत पदवी घ्यायची आहे. मला कॉमर्समध्ये शिकताना अनेक समस्या आल्या. परंतु त्या समस्यांवर मात करुन ७० टक्के पडले. त्यामुळे कॉमर्सची पदवी घेऊन पुढे सीए बँकींग करायचे आहे. - ललिता पवार, आर. ए. पोद्दार कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकोनॉमिक्स, माटुंगा.अंपग असल्याने अभ्यासाबरोबर मला माझी तब्बेत सुद्दा सांभाळायची होती. परंतु माझ्या कॉलेजने मला अभ्यासासाठी खुप मदत केली व ६७़०७ टक्के मिळाले़ पुढील शिक्षण घेऊन मला डॉक्टर बनायचे आहे. - अक्सा निसार पठान, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, चेंबूर.वझे-केळकर कॉलेजमधून आर्टस् शाखेतून बारावीत ८७.७९ टक्के मिळवले. अंधत्वावर मात करुन यश मिळविल्यामुळे सर्वांनाकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. आई-वडील भुवनेश्वर येथे राहतात आणि मी मामा-मामी यांच्याकडे राहत आहे.- श्रीकांत राठी, वझे-केळकर कॉलेज कुटुंबाचे सहकार्य आणि कॉलेजमधून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सायन्स शाखेतून ९६.१५ टक्के मिळवले आहेत. नवनीत ज्युनिअर कॉलेजमधून शिकत असताना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. आता पुढे इंजिनिअरकडे कल आहे.- मानसी सारस्वत, नवनीत ज्युनिअर कॉलेज वझे-केळकर कॉलेजमधून सायन्स विभागातून ८६ टक्के मिळविले आहेत. आई-वडील, कॉलेजचा संपूर्ण स्टाफने अभ्यासाबाबतची संपूर्ण मदत केली. प्रत्येकाने वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे आता हे यश मिळविले आहे. आता पुढे अर्थशास्त्र विषयात- धु्रव शिरपूरकर, वझे-केळकर कॉलेजसर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात पुढील प्रगतीसाठी आता अधिक संधी उपलब्ध झाली आहे, जेणेकरुन या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर यशस्वीरित्या घडविता येईल. हा निकाल म्हणजे अंतिम निकाल नाही.नव्या जोमाने परीक्षेची तयारी करा आणि फेरपरीक्षेत यशस्वी व्हा.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री