मुंबई : राज्यात शनिवारी सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २१.५ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्यात विदर्भात सर्वाधिक गारठा असून, रविवारी विदर्भात थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची तीव्रलाट होती, तर काही ठिकाणी थंडीची लाट होती. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर उर्वरित भागात किंंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १२ ते १५ जानेवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात येणार असून, १२ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशाच्या आसपास राहील...........................अकोला ९.९अमरावती ९.५ब्रह्मपुरी ६.३चंद्रपूर १०.४गोंदिया ७.६नागपूर ५.७वाशिम १०.६वर्धा ८.२यवतमाळ १०