मुंबई : राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा आता चढू लागला असून, कमाल तापमानानेही कहर केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमानदेखील ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत असून, या वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना उन्हाचे वाईट चटके बसू लागले आहेत.गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सर्वत्र कोरडे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोरही ओसरला आहे. परिणामी, राज्यातील थंडीचा कहर कमी झाला आहे. तर हवामान खात्यानुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे; आणि राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे.मुंबईच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. ते अनुक्रमे ३८, २३ अंशाच्या आसपास नोंद झाले, मागील तीन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या उन्हाने कहर केला आहे. पुढील ४८ तास हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईचे तापमान ३८ अंशावर
By admin | Published: February 24, 2015 4:30 AM