शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
5
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
6
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
7
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
8
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
9
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
10
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
11
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
12
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
13
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
14
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
15
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
16
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
17
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
18
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
19
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
20
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

By admin | Published: August 06, 2016 5:31 AM

शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला.

मुंबई : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. प्रतिकूल हवामानाचा परिणाम विमानसेवेवर झाला.शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. तिन्ही मार्गांवरील लोकल सकाळपासून १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चर्चगेट, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होती. नोकरदारांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला, सायन, माटुंगा, मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी १२.0५ दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतरही कुर्ला ते दादरपर्यंतचा लोकल प्रवास अत्यंत धिम्या गतीने होत होता. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून सीएसटी ते कल्याणपर्यंतचा प्रवास करण्यास मुभाही देण्यात आली होती. मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसलेला असतानाच पश्चिम आणि हार्बरवरील लोकलही १०-१५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीचाही वेग कमी झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. वाकोला रामनगर सब-वेजवळ, अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर, परेल टीटी, माटुंगा किंग्ज सर्कल जंक्शन, सायन मुख्याध्यापक भवन, कुर्ला कमानी फिनिक्स मॉलजवळ पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.>म.रे.च्या १२१ लोकल फेऱ्या रद्द दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेला शुक्रवारी मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावला व वेळापत्रकच विस्कळीत झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...आणि समुद्राने कचरा परत केला!मुंबईच्या समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याकडील कचरा समुद्रात फेकण्याची मुंबईकरांची खोड तशी जुनीच. मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले तर तो कुणापुढेच झुकत नाही. शुक्रवारी दुपारी समुद्राला आलेल्या भरतीवेळी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी शहराला जशास तसा परत केला. सकाळपासून पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. या वेळी मरिन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांमुळे समुद्रातील ३ ते ४ टन कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला.