ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत. वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल इतका हा जलसाठा आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंतचे मुंबईचे पाण्याचे टेन्शन अखेर मिटले आहे.गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. ७० ते ७५ टक्केच तलाव भरले असल्याने वर्षभराची पाण्याची तजवीज करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात ऑगस्ट २०१५ पासून लागू केली. या कपातीची झळ मुंबईकरांना वर्षभर बसली. मात्र यावर्षी उशीरा हजेरी लवणाऱ्या पावसाने दोन महिन्यातच आपला बॅकलॉग भरुन काढला. तरीही सर्वच तलाव भरून वाही पर्यंत साबुरीचा मार्ग अवलंबणारया पालिका प्रशासनाला राजकीय दबावापोटी ही पाणीकपात दोन महिन्यापूर्वीच रद्द करावी लागली,मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावांची पातळी कमी होऊ लागली होती. हीच परिस्थिती काही दिवस कायम राहिल्यास मुंबईकरांवर पाण्याचे संकट घोंगावत होते. मात्र ब्रेक के बाद परतलेल्या पावसाने तलावांमध्ये एकूण ९९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. पुढच्या जुलैपर्यंत मुंबईकरांसाठी हा पाणीसाठा मुबलक असल्याने पालिका अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. प्रतिनिधी चौकट मुंबईत दररोज ३७५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० सेप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवल १० लाख दशलक्ष लिटर्स जलसाठा होता. यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.