मुंबई : मित्रांसोबतचा लपंडावाचा खेळ घाटकोपरमधील ५वर्षीय चिमुरड्याच्या जिवावर बेतला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडीमध्ये लपण्यास गेल्यावर दरवाजा आतून बंद झाल्याने तेथेच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. घाटकोपर येथील दामोदर पार्क परिसरात राहणारा कुरबान रहिम खान शनिवारी सायंकाळी येथील पंकेशा बाबा दरगा परिसरात मित्रांसोबत लपंडाव खेळत होता. त्याच परिसरात गुन्हे शाखा ७ने जप्त केलेली वाहने पार्क केलेली आहेत. यातील तवेरा गाडीचा दरवाजा त्याला अर्धवट उघडा दिसल्याने तो लपण्यासाठी या (पान ९ वर)जप्त वाहनांच्या पार्किंगचे काय?विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहनांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांना ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र तेथे जागा नसल्याने ही वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली जातात. वर्षानुवर्षे ही वाहने रस्त्याकडेला धूळ खात पडून असतात. त्यातून मग असे अपघात किंवा गुन्ह्यांसाठी वापर होण्याची शक्यता वाढते. पोलीस प्रशासन यावर काय मार्ग काढणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गाडीमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Published: March 21, 2016 3:37 AM