ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एल.एल.बी.च्या प्रथम वर्षासाठी घेतलेल्या प्रवेश अर्जावर आपली जन्मतारीख १२ डिसेंबर असल्याचे नमूद केले आहे. पुण्यातील इंडियन लॉ कॉलेजमध्ये नोव्हेंबर १९७२ ते मार्च १९७३ या पहिल्या वर्षाच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश अर्ज भरला होता. त्यामध्ये १२ डिसेंबर १९४९ अशी जन्मतारीख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील नाथ्रा हे गाव जन्मठिकाण नमूद आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वक्तव्य केल्यानंतर मुंडे समर्थकांनी त्यांच्या जन्मतारखेशी निगडीत कागदपत्रेच सोशल मीडियामधून जाहीर केली आहेत. त्यामध्ये मुंडे यांनी पुण्यातील एल.एल.बी. शिक्षणासाठी प्रवेश अर्ज दाखल करताना नोंदविलेल्या जन्मतारखेचा एक पुरावा समोर आला आहे. दरम्यान मुंडे समर्थक आणि भाजपाने अजित पवार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत.
मुंडेंच्या एलएलबी प्रवेश अर्जावर १२ डिसेंबरच जन्मतारीख
By admin | Published: February 08, 2017 9:27 PM