शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पालिकेचा सफाई कामगार बनला म्हाडा अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:58 AM

सकाळी हातात झाड़ू घेऊन सफाई कामगाराची जबाबदारी पाडायची. कामावरून सुट्टी होताच, सुटाबुटात म्हाडाचा अधिकारी म्हणून बाहेर पडायचे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सकाळी हातात झाड़ू घेऊन सफाई कामगाराची जबाबदारी पाडायची. कामावरून सुट्टी होताच, सुटाबुटात म्हाडाचा अधिकारी म्हणून बाहेर पडायचे. शासकीय कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून, कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगाराचे बिंग फोडण्यात सायन पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र शंकर घाडगे (४७) असे अटक आरोपीचे नाव आहे. गोवंडीचा रहिवासी असलेला राजेंद्र पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सफाई कामगार म्हणून आहे. सकाळच्या सुमारास हातात झाड़ू घेऊन सफाई करायची. ड्युटी संपताच सूट, बूट, टाय लावून बाहेर पडायचे. मित्र, नातेवाईक यांना तो म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत असे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे कोणीही त्याच्यावर सहज विश्वास ठेवत असे. याचाच फायदा घेत, २०१५ मध्ये सायन परिसरात राहत असलेले संदीप माने यांची घाडगेसोबत ओळख झाली. माने घराच्या शोधात असल्याचे समजताच, घाडगेने त्याला म्हाडात स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शासकीय कोट्यातून ८ फ्लॅट माझ्याकडे आहेत. त्याची किंमत ४० लाख इतकी आहे. मात्र, सुरुवातीला अवघ्या ७ लाख रुपयांत तो फ्लॅट्स तुमच्या नावावर करू शकतो. उर्वरित रकमेचे कर्ज अथवा अन्य कारण देऊन ती कमी करू शकतो, याचे आमिष त्याने दाखविले. स्वप्ननगरीत अवघ्या ७ लाखांत हक्काचे घर मिळणार, यासाठी माने यांनी पैशांची गुंतवणूक केली. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी, तसेच घरातील दागिने गहाण ठेवून ७ लाख रुपये जमा केले. घाडकेकडे पैसे दिले. पैसे देऊन दोन वर्षे उलटत आली, तरीही फ्लॅटची चावी मिळत नसल्याने, माने यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. घाडगेने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यांनी याबाबत सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी घाडगेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.तपास अधिकारी संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार पंकज सोनावणे, धनराज पाटील आणि महेंद्रसिंग पाटील यांनी घाडगेचा शोध घेण्यास सुरुवात केली. या प्रकरणात मानेसह सात जणांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले. यात ६५ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे. त्यांनी पत्नीला हक्काच्या घरात नेण्यासाठी तिचे सोन्याचे मंगळसूत्रही विकले. तपासात तो पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट होताच, तपास पथकाने मोर्चा पालिकेकडे वळविला. मात्र, पोलीस आल्याची माहिती मिळताच घाडगे तेथून पळ काढत असे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्याच्या घरच्या पत्त्यावरदेखील कोणीच नव्हते. घरातली मंडळी सातारा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास सुरू असताना, मंगळवारी सायंकाळी घाडगे सायन परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, गायकवाड यांनी पथकासह सापळा रचला आणि घाडगेला बेड्या ठोकल्या. मानखुर्दमध्ये दोन कोटींचा गंडाम्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी बुधवारी मानखुर्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कुर्ला न्यायालयाच्या आदेशाने मानखुर्द पोलिसांनी बन्सीलाल गुप्ता, सचिन सिद्धू, रजनीत सिद्धू, किरण सिद्धू यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकडीसह त्यांचे नातेवाईक आणि अन्य साथीदारांनी म्हाडामध्ये घर देण्याच्या नावाखाली तक्रारदार बलराम शिरसाठे यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपये उकळले. त्यांना घरासंबंधीचे खोटे भोगवटापत्रही दिले होते. शिवडीत २८ लाखांची फसवणूकम्हाडाचे घर मिळवून देतो, म्हणून शिवडीत नानोसे निवत्ती इंगळे (४५) यांच्याकडून डिसेंबर २०१४ पासून तब्बल २८ लाख रुपये उकळण्यात आले. पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने, इंगळेंनी मंगळवारी रफिक अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातही घाडगेचा काही सहभाग आहे का? या दिशेनेही तपास सुरू आहे. तुमचीही फसवणूक झालीय का?घाडगेने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे घाडगेच्या जाळ्यात अडकून फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायन पोलिसांनी केले आहेत.