शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नोटाबंदीमुळे महापालिकांची चांदी

By admin | Published: November 14, 2016 5:01 AM

केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे राज्यातील महापालिकांची मात्र चांदी झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद केल्या असल्या तरी वीज

मुंबई : केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे राज्यातील महापालिकांची मात्र चांदी झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद केल्या असल्या तरी वीज, पाणी, मालमत्ता करासह शासकीय देयकांसाठी जुन्या नोटांचा वापर करण्याची सवलत दिली होती. नागरिकांनी या सवलतीचा पुरेपूर लाभ घेतला असून, विविध महापालिकांमध्ये दोन दिवसांत ३४० कोटींचा करभरणा झाला आहे. आज (सोमवार) या सवलतीचा शेवटचा दिवस असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटांद्वारे करभरणा करण्यात नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी ८ ते रात्री ८पर्यंत सर्व महापालिका, नगरपालिका कार्यालये सुरू होती. सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी असली तरी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्व महापालिका व नगरपालिका कार्यालयांमध्ये कर स्वीकारण्याची सोय करण्यात आल्याचे नगरविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे. जुन्या नोटांनी करभरणा करण्याची सुविधा देण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या कार्यालयांत विविध करांचा भरणा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. आतापर्यंत ३३९ कोटी ५७ लाखांचा कर विविध महापालिकांच्या तिजोरीत जमा झाला आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत महापालिकानिहाय जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे: -मुंबई (४३ कोटी ७ लाख), नवी मुंबई (१७ कोटी १६ लाख), कल्याण-डोंबिवली (२२ कोटी ४४ लाख), मीरा-भार्इंदर (११ कोटी ४९ लाख), वसई- विरार (५ कोटी ९८ लाख), उल्हासनगर (१७ कोटी ८ लाख), पनवेल (१३ कोटी २ लाख), भिवंडी-निजामपूर (७ कोटी ६९ लाख), पुणे (४१ कोटी ६७ लाख), पिंपरी-चिंचवड (१५ कोटी ८२ लाख), ठाणे (१४ कोटी ५० लाख), सांगली-कुपवाड (५ कोटी ९२ लाख), कोल्हापूर (३ कोटी ४२ लाख), अहमदनगर (४ कोटी ६ लाख), नाशिक (११ कोटी ७ लाख), धुळे (५ कोटी ४० लाख), जळगाव (५ कोटी ७ लाख), मालेगाव (३ कोटी ८५ लाख), सोलापूर ( ९ कोटी ३५ लाख), औरंगाबाद (४ कोटी ४२ लाख), नांदेड-वाघाळा (५ कोटी १८ लाख), अकोला (१ कोटी ६५ लाख), अमरावती (४ कोटी ४६ लाख), नागपूर (९ कोटी ९० लाख), परभणी (२४ कोटी), लातूर (३ कोटी १२ लाख), चंद्रपूर (१ कोटी ४७ लाख) याशिवाय राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये ६२ कोटी ९५ लाखांचा करभरणा झाला आहे. (प्रतिनिधी)