नगर परिषद निवडणूक: युतीला तीन, काँग्रेस आघाडीला दोन नगराध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:00 AM2019-01-29T05:00:33+5:302019-01-29T05:01:20+5:30
श्रीगोंद्यात भाजपाला बहुमत, मात्र नगराध्यक्षपद हुकले
मुंबई : राज्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला तीन, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला दोन नगराध्यक्ष मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या; मात्र नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत छोट्या शहरांमधील मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. १९ पैकी १४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे बहुमताने विजयी झाल्या आहेत.
रायगडमध्ये कर्जत नगरपालिकेत राष्टÑवादी काँग्रेसचा दारुण पराभव करत भाजपा-शिवसेना युतीने विजय संपादन केला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या. गडचिरोलीत आरमोरी नगरपालिका आणि नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीत भाजपाला यश मिळाले. बीड नगरापरिषदेच्या वार्ड क्रमांक ११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीने बाजी मारली. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उमेदवाराचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवाराने पराभव केला.
आरमोरी नगर परिषद (जि. गडचिरोली): एकूण जागा-१७, भाजपा-८, काँग्रेस-६, शिवसेना-१, परिवर्तन-१, भाकप-१,
नगराध्यक्ष - पवन नारनवरे (भाजपा)
मलकापूर नगरपरिषद (जि. सातारा) : एकूण जागा-१९, काँग्रेस-१४, भाजपा-५, नगराध्यक्ष -निलम येडगे (काँग्रेस)
महादुला नगरपंचायत (जि. नागपूर) : एकूण जागा-१७, भाजपा-११, काँग्रेस-४, बसपा-१, अपक्ष-१, नगराध्यक्ष -राजेश रंगारी (भाजपा)
श्रीगोंदा नगर परिषद (जि. अहमदनगर) : एकूण जागा - १९, भाजपा - ११, काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी-८,
नगराध्यक्ष - शुभांगी
पोटे (काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी)
कर्जत नगरपरिषद (जि. रायगड) : एकूण जागा- १८,भाजपा- ४, शिवसेना-४, आरपीआय-२, राष्टÑवादी-८
नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)