मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत शुक्रवारी स्पष्ट केले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.
फडणवीस म्हणाले की, आयोगाने ४ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेला निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाहीत. या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. वाॅर्डांच्या खटल्यात स्थगिती नाही. मात्र आरक्षणाच्या बाबतीत सर्व महापालिकांचे खटले एकत्रित केले आहेत. न्यायालयाच्या निर्णयापुढे आपण नाही.
सॅनिटरी नॅपकिनमध्ये गैरव्यवहार नाहीबृहन्मुंबई महापालिकेमार्फत बाजारभावापेक्षा कमी दराने आणि तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या करारासह प्रायोगिक तत्त्वावर केवळ २०० सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन घेण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी अनिल परब यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविषयी आणलेल्या हक्कभंगावर दिली.