मुंबई : प्रशासकीय कामकाजात नैतिकता पाळण्यास मुंबई पालिकेच्या ३६० अधिकार्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. पाच दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी पालिकेने प्रत्येक अधिकार्यामागे २१ हजार रुपये खर्च केले. मात्र ही नैतिकता प्रशासकीय कामकाजात दिसत नसल्याने ६९ लाख रुपयांचा पालिकेचा खर्च पाण्यात गेल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई महापालिकेत ‘अ’ वर्गातील ३६० अधिकार्यांना प्रशासकीय नैतिकतेचे प्रशिक्षण वर्ग पाचगणी येथील एका संस्थेच्या वतीने देण्यात आले. आॅक्टोबर २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत हे प्रशिक्षण पार पडले. यासाठी प्रत्येक अधिकार्याला १५ हजार रुपये शुल्क आणि ५ दिवसांचे जेवण व राहण्याच्या व्यवस्थेसाठी ६ हजार रुपये याप्रमाणे २१ हजार २५० रुपये खर्च करण्यात आले. मात्र दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय कामांमध्ये नैतिकतेचे धडे गिरवूनही अधिकार्यांकडून नैतिकता पाळली जात नाही. (प्रतिनिधी)
पालिका अधिकारी नैतिकता विसरले !
By admin | Published: May 20, 2014 2:59 AM