शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

महापालिका, जि. प. आणि पं. स. निवडणुकांपुर्वी मतदान नोंदणी करा - निवडणूक आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 6:54 PM

बृहन्मुंबईसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 : बृहन्मुंबईसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित; तसेच दुबार, स्थलांतरित व मयत व्यक्तीची नावे वगळावित, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांची मुदत मार्च-एप्रिल 2017 पर्यंत संपत आहेत; तर पाच महानगरपालिकांची मुदत मे व जून 2017 मध्ये संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदविण्याची अंतिम संधी आहे. कारण 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित तयार होणारी विधानसभेचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगातर्फे 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रमात नवीन मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच मतदार यादीतील आपले नावाबाबत अथवा पत्त्यातील तपशिलांत दुरुस्त्या करावयाच्या असल्यास त्यादेखील करता येतील; तसेच दुबार किंवा आपल्या कुटुंबातील मयत व्यक्तीचे नावदेखील वगळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

मार्च- एप्रिल 2017 पर्यंत मुदत संपणाऱ्या महानगरपालिका: 1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) पुणे, 5) पिंपरी-चिंचवड, 6) सोलापूर, 7) नाशिक, 8) अकोला, 9) अमरावती आणि 10) नागपूर.

मे- जून 2017 पर्यंत मुदत संपणाऱ्या महानगरपालिका:1)भिवंडी- निजामपूर, 2) मालेगाव, 3) लातूर, 4) परभणी आणि 5) चंद्रपूर.निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या:1)रायगड- 15, 2)रत्नागिरी- 9, 3)सिंधुदुर्ग- 8, 4)नाशिक- 15, 5)जळगाव- 15, 6)अहमदनगर- 14, 7)पुणे- 13, 8)सातारा- 11, 9)सांगली- 10, 10)सोलापूर- 11, 11)कोल्हापूर- 12, 12)औरंगाबाद- 9, 13)जालना- 8, 14)परभणी- 9, 15)हिंगोली- 5, 16)बीड- 11, 17)नांदेड- 16, 18)उस्मानाबाद- 8, 19)लातूर- 10, 20)अमरावती- 10, 21)बुलढाणा- 13, 22)यवतमाळ- 16, 23)नागपूर- 13, 24)वर्धा- 8, 25)चंद्रपूर- 15, आणि 26)गडचिरोली- 12.

मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम:विद्यापीठे व महाविद्यालयांचा मतदार जागृतीत सहभाग.विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था.मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून मतदारांना आवाहन.सहकारी गृहनिर्माण संस्थांना 100 टक्के मतदार नोंदणीचे आवाहन.मतदार जागृतीसाठी मोबाईल कंपन्यांकडून जनहितार्थ एसएमएस.उद्योजक, बँक व कंपन्यांना मतदार जागृतीसाठी आवाहन.कम्युनिटी रेडिओच्या माध्यमांतून मतदार जागृती.सोशल मीडियाचा मतदार जागृतीसाठी वापर.विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन.नाटकांच्या मध्यंतरात थिएटरमध्ये मतदार जागृतीची उद्‌घोषणा.