लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : घराच्या इंटिरिअरचे काम घेण्याच्या वादातून केलेल्या बेछूट गोळीबारात किशोर चौधरी यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. व्यावसायिकावर १९ गोळ््या झाडण्यात आल्या. ही घटना ठाकुर्ली चोळेगावात मंगळवारी सकाळी घडली. दिलीप भोईर, परेश आंधळे, सूरज भोईर, शंकर भोईर यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर चौधरी हे इंटिरिअरचे काम करतात. काम घेण्यावरून दिलीप भोईर यांचा चौधरी यांच्याशी वाद आहे. मंगळवारी सकाळी चौधरी हे देवी शिवामृत सोसायटीमधील ज्या घरात इंटिरिअरचे काम करायचे होते तेथे बसले होते. त्यांच्यासोबत त्याचे सहकारी नितीन जोशी व प्रमोद हेदेखील होते. अचानक दिलीप भोईर व त्याचे साथीदार त्या फ्लॅटमध्ये घुसले आणि त्यांनी चौधरी यांच्या दिशेने १९ गोळ््या झाडल्या, त्यापैकी १२ गोळ््या चौधरी यांना लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक गोळी नितीन जोशी यांच्या छातीत घुसल्याने ते जखमी झाले. हल्लेखोरांनी प्रमोद यांना सोबत घेऊन पळ काढला. मात्र प्रमोद यांनी दिलीप याच्या तावडीतून सुटका करून घेतली.
ठाकुर्लीत १९ गोळ्या झाडून व्यावसायिकाची हत्या
By admin | Published: May 10, 2017 3:11 AM