शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या

By admin | Published: May 19, 2016 12:29 AM

पळसे गावात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ज्योती सुदाम थेटे (२२) या युवतीची प्रेमप्रकरणातून शशिकांत शांताराम टावरे (२८) या युवकाने धारदार शस्त्राने हत्या केली

नाशिक : पळसे गावात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ज्योती सुदाम थेटे (२२) या युवतीची प्रेमप्रकरणातून शशिकांत शांताराम टावरे (२८) या युवकाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पळसे गावात राहणाऱ्या ज्योती सुदाम थेटे (२२) व शशिकांत यांच्यात प्रेमप्रकरण होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शशिकांत याने ज्योतिवर धारधार शस्त्राने हल्ला केला व स्वतलाही गंभीर जखमी करुन घेतले. या हल्ल्यात ज्योतीचा मृत्यू झाला असून शशिकांत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खून झाल्याची बातमी समजताच पळसे गावात जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त श्रीकांत धीवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कुमकसह पळसे गावात दाखल झाले. दरम्यान, कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या हत्येमागे एकतर्फी प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.