शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

खळबळजनक! एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?; गिरीश महाजन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 7:16 PM

गिरीश महाजन सध्या मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना काय बोलावं सूचत नाही. अत्यंत खालच्या पातळीवरचं नीच राजकारण मी आयुष्यात कधी केले नाही.

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन-खडसे वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद इतक्या टोकाला पोहचला की आता एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं? ही हत्या होती की आत्महत्या हादेखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा वाद वैयक्तिक पातळीवर पोहचल्याचं दिसून येत आहे. 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मुली असणं सुदैवीच आहे. माझ्या मुली आहेत मला आनंद आहे. त्यांनाही एक मुलगा होता त्याचे काय झाले याचे उत्तरही खडसेंनी द्यावं. मला या विषयात बोलायचं नाही. परंतु ते माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहचणार असतील तर त्यांच्या मुलाचं ३२ व्या वर्षी काय झालं? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय आहे. मी अजून काही बोललो तर ते त्यांना झोंबेल असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं? आत्महत्या झाली की त्याचा खून झाला? मग हे तपासण्याची गरज आहे असंही गिरीश महाजन म्हणाले. जिल्हा नियोजन बैठकीत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे समोरासमोर आले होते. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असा सवाल गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. 

गिरीश महाजनांच्या विधानावर खडसेंचा हल्लाबोलगिरीश महाजन सध्या मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना काय बोलावं सूचत नाही. अत्यंत खालच्या पातळीवरचं नीच राजकारण मी आयुष्यात कधी केले नाही. त्यांचे अनेक उद्योग मला माहिती आहे. अगदी गेस्टहाऊसमध्ये काय घडलं? त्या काळातील वर्तमान पत्र उघडले तर सगळे उघड होईल. आता माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या याबाबत शंका असेल तर ते सत्तेत आहेत. त्यांनी चौकशी केली तर माझी हरकत नाही असं एकनाथ खडसेंनी पलटवार केला. 

त्याचसोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी घरात नव्हतो. रक्षा खडसे आणि दोघेच घरी होते. मग रक्षा खडसेंनी खून केला असे त्यांचे म्हणणं असेल तर त्याबाबत सीबीआयमार्फत चौकशी करावी. माझ्या अनेक प्रकरणाची चौकशी केली. कारण नसताना हे उद्योग चाललेत. माझी सीबीआय, अँन्टी करप्शन चौकशी सुरू आहे. मी ज्यांना मोठे केले त्याच माझ्यावर आरोप लावतायेत. दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नसल्याने त्यांना माझे दु:ख कळणार नाही. घाणेरडे, नीच राजकारणात जायचं नाही. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्यात असे आरोप करणे वेदनादायी आहे. कुणाचं व्यक्तिमत्व कसे आहे? मुलीबाळींशी कोण कसे वागतं हेदेखील सगळ्यांना माहिती आहे असं घणाघात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे