शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

छेडखानीच्या वादातून गुंडाची हत्या

By admin | Published: October 05, 2014 2:22 AM

अकोला येथे छेडखानीच्या वादातून निर्घृण हत्या ; तीन संशयीत अटकेत.

अकोला : छेडखानीच्या वादातून गुंड प्रवृत्तीचा सारंग अशोक गायकवाड (२२) याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी अकोल्यात घडली.अकोल्यातील बाळापूर नाक्यावरील भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड हा सकाळी त्याच्या एका मित्राकडे गेला होता. तेथून तो डाबकी रोडवरील मास्टर पॉवर जिमजवळ आला. या ठिकाणी वानखडेनगरातील अभिषेक खरसाळे, संतोष चितोडे आणि सोपीनाथनगरातील निखिल सहारकर एकत्र आले. त्यावेळी सारंग गायकवाड याने चाकूने निखिल सहारकर याच्यावर हल्ला चढविला. निखिलने त्याचा चाकू हातात पकडून, सारंगची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु सारंगने त्याला पुन्हा चाकू मारण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आरोपींनी सारंगच्या डोक्यात दगडी फरशी घालून, त्याच्यावर चाकूने वार केले. सारंग रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मास्टर पॉवर जिममधील युवकांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी सारंगला तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ** मृतकावर अनेक गंभीर गुन्हेसारंग गायकवाड हा कुख्यात गुंड होता. २७ जुलै २0१२ रोजी किरकोळ वादातून त्याने हरिहरपेठेतील सचिन सुरेश हिवराळे (१९) याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मार्च २0१३ मध्ये त्याने युवतीची छेड काढली होती. त्यावरून वाद झाला होता. या वादात सारंगने डाबकी रोडवरील युवकांना मारहाण केली होती. ** तिघे जण ताब्यात आरोपींनी हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी मोटारसायकलने पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी अभिषेक खरसाळे, निखिल सहारकर, संतोष चितोडे यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्यांना देवरी फाट्याजवळ पकडले. तिघांनीही सारंगची हत्या केल्याची कबुली दिली.