शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बॉम्बस्फोटाद्वारे पत्नीची हत्या, बांग्लादेशीला कळव्यात अटक

By admin | Published: November 05, 2016 12:05 AM

बांग्लादेशातील नराईल जिल्ह्यात बॉम्बस्फोट करून सुलताना या आपल्याच पत्नीची हत्या करणाऱ्या बशीरमुल्ला शेख (४०) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने कळव्यातून

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 03 - बांग्लादेशातील नराईल जिल्ह्यात बॉम्बस्फोट करून सुलताना या आपल्याच पत्नीची हत्या करणाऱ्या बशीरमुल्ला शेख (४०) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने कळव्यातून अटक केली आहे. त्याने कळवा परिसरात चोऱ्याही केल्या आहेत. त्याला ठाणे न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बशीरमुल्ला हा नवी मुंबईच्या घणसोलीतील रहिवाशी असून, एका चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना त्याची खबर वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला ४ नोव्हेंबर रोजी कळव्यातील मनिषानगर गेट क्रमांक एक येथून अटक केली. त्याच्यावर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने मार्च २०१६ मध्ये बांग्लादेशातून विना पासपोर्ट, बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याच्या कायद्यान्वये कारवाई केली होती. त्या गुन्हयात तो जामीनावर सुटला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट एकचे निरीक्षक ठाकरे, रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, जमादार अशोक माने, हवालदार आनंदा भिलारे, प्रकाश कदम, सुनील जाधव, सुभाष मोरे, संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, सुनील मोरे आदींच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने त्याची चौकशी केली. त्याने बांग्लादेशात दहशतवादी संघटनांकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्याच प्रशिक्षणामुळे त्याने त्याच्या बांग्लादेशातील घरी बॉम्ब तयार करुन नराईल जिल्हयात बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली. याच स्फोटात त्याने त्याची पत्नी सुलतानाची हत्या केली. बशीरमुल्ला आणि इतर आरोपींविरुद्ध नराईल जिल्ह्यातील कलीया पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, तो यात पसार असल्याची माहिती पोलिसांना बांग्लादेशातून मिळाली. तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे? त्याच्याविरुद्ध बॉम्बस्फोट आणि इतर कोणते गुन्हे बांग्लादेशात दाखल आहेत? भारतात वास्तव्य करण्यामागे त्याचा देशविघातक हेतू आहे किंवा कसे? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे मणेरे यांनी सांगितले.