शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या नराधमास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 10:12 PM

फ्रेंच पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे तीन तुकडे करणारा पती गिरीश श्रीरंग पोटे ( ३२ ) याला आज ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची

 धीरज परब/ऑनलाइन लोकमत मीरारोड ( ठाणे ), दि. 5  -  आपल्या फ्रेंच पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे तीन तुकडे करणारा पती गिरीश श्रीरंग पोटे ( ३२ ) याला आज ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह .  ३ डिसेंबर २०१३ रोजी हे हत्याकांड घडले होते.  त्यावेळी जगभरात हे हत्याकांड गाजले होते. 

मूळची फ्रान्सची नागरिक असलेली मधुवंती हिने गिरीश सोबत २०१० साली प्रेमविवाह केला होता. बेरोजगार असूनही ऐशो आरामाची चटक असलेल्या गिरीशने मधुवंतीला आपल्या जाळ्यात अडकवले होते . मधुवंतीने आपल्या आईचा मुंबईतील फ्लॅट विकून त्यातून आलेल्या पैशातून हेवी डिपॉझिट वर मीरा रोडच्या नक्षत्र टॉवर मध्ये फ्लॅट घेतला होता. बेरोजगार गिरीशमुळे मधुवंतीच घरखर्च चालवत होती. आईचा फ्लॅट विकून मिळालेले पैसे संपायला आल्याने गिरीशचा तिच्या आईच्या दुसऱ्या फ्लॅट वर डोळा होता . या वरून दोघां मध्ये भांडणे होत होती . गिरीशच्या जाचाला कंटाळलेल्या मधुवंतीने पुन्हा मायदेशी फ्रान्सला जाण्याची तयारी चालवली होती . चैन करायची चटक लागलेल्या गिरीशने यातूनच मधुवंतीची ३ डिसेंबर रोजी गळा आवळून हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून तिच्या शरीराचे तीन तुकडे केले . धड व डोके फ्रिज मध्ये ठेवले तर पायाचा भाग बेड मध्ये ठेवला होता . तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना त्याने हत्येप्रकरणी आपल्या मामेभावास सूचकपणे बोलून दाखवल्याने हत्येचा प्रकार उघड होऊन पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती . हत्येच्या आधीच त्याने अडीच वर्षाचा मुलगा ऍग्रीयन याला आपल्या आई वडिलांकडे सोडले होते. या हत्येप्रकरणी नवघर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक निरीक्षक सतीश शिवरकर यांनी पोटेला अटक करण्यासह प्राथमिक तपास केला होता . पुढील तपास तत्कालीन निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी केला होता. फ्रांसच्या सरकारने हत्येची दखल घेतली होती. मधुवंती चा मृतदेह अंत्यविधी साठी फ्रान्सला नेण्यात आला होता . आता तीन वर्षांनी या हत्येचा निकाल आला असून, ठाणे न्यायालयाने गिरीश पोटे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .