ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - मुरुडमधील समुद्रात १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्यांचे पालक करत होते. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करत होते. अखेर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १३० विद्यार्थ्यांची सहल फेब्रुवारी महिन्यात मुरुडला गेली होती. यावेळी १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.