शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

मुरूडच्या समुद्रात १३ विद्यार्थी बुडाले

By admin | Published: February 02, 2016 4:23 AM

पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे

सहलीवर काळाचा घाला : मृतांमध्ये पुण्यातील १० मुली आणि ३ मुले, एक बेपत्ता; सहा जणांना वाचविलेआगरदांडा / अलिबाग / मुुरूड : पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे. मृतांमध्ये १० मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी २० ते २२ वयोगटातील होते. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली.पुण्यातील आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थी व शिक्षक तीन बसमधून रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आले होते. त्यामध्ये बीएस्सी व बीसीएचे ११५ विद्यार्थी आणि ११ शिक्षक आणि कर्मचारी असा १२६ जणांचा समावेश होता. त्यातील २० विद्यार्थी पोहण्यासाठी मुरूडजवळील समुद्रात गेले आणि त्याचवेळी ते आत खेचले गेले. त्यात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. पुण्यातून आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अलिबाग येथे पर्यटन केले. त्यानंतर सोमवारी २च्या सुमारास ते मुरूड येथे पोहोचले. तेथेच हॉटेलमध्ये जेवण केल्यावर जवळपास २० विद्यार्थी समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले. या विद्यार्थ्यांना काही ग्रामस्थांनी हटकले मात्र तरीही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात मौज करण्याच्या हेतूने पुढे सरसावले. नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. बचावले : अनुजा चाटर्जी, सुभानी शेख, स्नेहा अनमद, कविता जिना, अल्फीया काझी, शेख शिकद हे सहा विद्यार्थी बचावले. मात्र सय्यद अली मटकी हा बेपत्ता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सागर पाठक यांनी सांगितले.घटनास्थळी संस्थेचे पदाधिकारी रवाना झाले असून, शासकीय रुग्णालयात काहींवर उपचार सुरू आहेत. १० अ‍ॅम्ब्युलन्स पुण्यातून पाठविण्यात आहेत.- पी. ए. इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनएज्युकेशन सोसायटी, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयदोन लाखांची मदत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीची घोषणा रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केली. मृतांची नावे : सुमय्या मुमताज अन्सारी, शाफिया अन्सारी, रफिया मुमताज अन्सारी, शिफा अब्दुल बाशिद काझी, सुप्रिया पान, सना मुनीर शेख, स्वप्निल शिवाजी सलगर, साजीद चौधरी, इफ्तेखार अब्बासअली शेख, समरीन फिरोज शेख, फरीन सय्यद हुसेन, मोहम्मद युनूस इफ्तेखार अन्सारी, राजलक्ष्मी पंडुगायाला.