मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:01 PM2023-11-07T12:01:45+5:302023-11-07T12:03:23+5:30

जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. - राऊत

Mushrif, Ajit Pawar, chagan Bhujbal are also members of Mahadev App; Sanjay Raut's target Eknath Shinde on Gram panchayat election result | मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे पण महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकासंदर्भात घटनाबाह्य सरकार जे फटाके वाजवतेय ते फुसके आहेत. हे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत हा मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचे सरकार आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत, असा आरोपही राऊतांनी केला आहे. 

या लोकांनी पंचायती राज समजून घ्यायला हवे. पण हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात, त्यांची हातभर फाटते, त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे सरकार, जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. घ्या तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं?  असे आव्हान राऊत यांनी शिंदे-फडणवीसांना दिले. 

या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचे सरकार आहे यात राज्याची बदनामी होतेय. ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. 50 खोके 40 खोके ते आकड्यावरच जगतात. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळता. एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे, अशी टीका राऊत यांनी केली. 

मराठ आरक्षण- ओबीसी हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे. यामुळे या ठिकाणचे रोजगार, उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये. या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले. 

महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत. जेलमध्ये पाठवायचं होते, त्यांची आता पूजा केली जातेय. देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावर फुले टाकतात. गोंदियामध्ये तुम्ही बघितले असेल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचे स्वागत केलेय. इकबाल मिरची सोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता. आता तेच हातात हात घालून चालत होते हे सगळे महादेव अॅपची कमाल आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. 

Web Title: Mushrif, Ajit Pawar, chagan Bhujbal are also members of Mahadev App; Sanjay Raut's target Eknath Shinde on Gram panchayat election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.