शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

संगीतातील स्वर हाच ईश्वर आहे

By admin | Published: January 19, 2015 12:55 AM

संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि

उस्ताद अमजद अली खाँ : नेणारा आणि आणणारा माणसाचा देव एकचनागपूर : संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि शब्दामुळेच ते पराभूतही होतात. संगीत मात्र स्वरांमधून अभिव्यक्त होते. संगीत ही अनुभवाची आणि त्यापलिकडेही अनुभूतीची बाब आहे. ती भावनांची भाषा आहे, माणुसकीची आहे. जगात अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय असले तरी माणसाचा देव एकच आहे. जो या जगात तुम्हाला आणतो आणि घेऊन जातो तो देव एकच. त्याला नाव देण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. माझ्यासाठी स्वर हाच ईश्वर आहे, असे मत ज्येष्ठ सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी रविवारी व्यक्त केले. बुद्ध महोत्सवात त्यांना वादनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता अनेक विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी मी सहसा मौन राहतो कारण त्यानंतर सादरीकरण करायचे असते. मौनामुळे संगीताशी अधिक जुळता येते. कार्यक्रमाला प्रारंभ करेपर्यंत काय वाजवायचे ते ठरले नसते. त्यावेळी जो मूड लागतो त्याप्रमाणे वादन घडत जाते. संगीत हे माणसांना जोडणारे आहे. त्यामुळेच संगीताचा कुठलाच मजहब नाही. हल्ली संगीत गंभीरपणे लोक शिकत नाहीत पण संगीत गंभीरपणे शिकण्याकडे नक्कीच लोक वळतील. सध्या फक्त स्वत:चा अल्बम काढण्यासाठी लोक संगीत शिकत आहेत. पण त्यामुळे संगीत समजत नाही आणि शिकताही येत नाही. ते टिकतही नाही. संगीत समजून घेण्यासाठी शिकले पाहिजे. संगीतात आयुष्याचा अर्थ दडला आहे आणि संगीत माणसाला समृद्धच करते. संगीत शिकणे म्हणजे प्रकाशाचा शोध घेणे आहे. एका अंधाऱ्या पोकळीत घुसून प्रकाशाचा शोध घेत राहणे म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. त्यासाठी पेशन्स लागतोच. शास्त्रीय गायक म्हणायचे आणि सूरांना बांधता येत नसेल तर अर्थ नाही. रंजकता नसेल तर ते संगीत कसे? रसिकांना आपले संगीत आवडायला हवे. सध्या जगातील अनेक देशात भारतीय संगीतासह फ्युजन होते आहे. फ्युजन पेक्षाही कोलॅबरेशन म्हणजे जास्त योग्य होईल, असे ते म्हणाले.