पुणे : कुणी घरातील सदस्याशी विनाकारण संबंध तोडत नाही. त्याच्या अक्षम्य वागणुकीमुळे दाते कुटुुंबीयांवर ही वेळ आली. लोकांची फसवणूक करण्यापासून ते त्याला दिलेला राहता फ्लॅट विकण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी संगीतने केल्या आहेत. त्याच्याबाबत पोलिसांकडे तक्रारीदेखील दाखल आहेत. करोडो रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आले. शक्य तेवढी मदत आम्ही त्याला केली. तरीही, त्याच्या वर्तनामध्ये कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून आम्ही त्याच्याशी सगळे संबंध तोडले असल्याचे स्पष्टीकरण वडील आणि ज्येष्ठ गायक अरुण दाते व त्याचा भाऊ अतुल दाते यांनी दिले.अरुण दाते यांचा मुलगा संगीत वाकड पुलाखाली अन्नपाण्यावाचून बेवारस पडला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यांना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या पुढाकाराने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले, त्या वेळी मोठ्या भावाने प्रॉपर्टीमधून बेदखल केल्याचे संगीत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर संगीत यांच्या वागणुकीसह त्यांनी लोकांच्या केलेल्या फसवणुकीसंदर्भात माहिती देऊन दाते कुटुंबीयांनी आपली बाजू ‘लोकमत’समोर मांडली. (प्रतिनिधी)कुटुंबीय बेजारदारूचे व्यसन आणि आक्रमक स्वभाव या त्याच्या वागणुकीमुळे सगळे कुटुंबीय बेजार झाले होते. त्याच्या या वर्तनामुळे संगीतशी सर्व संबंध कधीच तोडले आहेत. त्याच्याशी कुणीही कुठलाही व्यवहार केला तर मी किंवा माझे कुटुंबीय जबाबदार राहणार नाहीत, अशा आशयाची जाहिरात आम्ही वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. आता त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नसताना दाते कुटुंबीयांना पुन्हा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.- अरुण दाते, अतुल दाते
‘रस्त्यावरच्या जिण्याला ‘संगीत’च जबाबदार’
By admin | Published: September 02, 2016 1:58 AM