शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

लोणावळ्यात मुस्लीम बांधवांनी केला पाकिस्तानचा जाहीर निषेध

By admin | Published: October 01, 2016 3:47 AM

पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहरातील मुस्लीम समाजातर्फे शुक्रवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.

लोणावळा : पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहरातील मुस्लीम समाजातर्फे शुक्रवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. ‘हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल आॅपरेशनचे स्वागत करत नवाज शरीफ मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व कायम राहील. पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारस्थाने करत राहिला आहे. पाकच्या या नापाक कारवाया व दहशतवादाला भारत कधीच भीक घालणार नाही. भारत हा अभेद्य असून, येथील मुस्लीम समाज हा भारतीय लष्कराच्या पाठीशी आहे. दूध मागोंगे तो खिर देंगे, काश्मीर मागोंगे तो चिर देंगे, अशा शब्दांत मुस्लीम समाजाने पाकचा निषेध नोंदवला व उरी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.नगराध्यक्ष अमित गवळी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळ्याचे इमामसाहब मौलाना मोईनद्दिन खान असरफी, माजी नगरसेवक नासिर शेख, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू बोराटी, यशवंत पायगुडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, बाळासाहेब जाधव, निखिल कवीश्वर, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल शेट्टी, संध्या खंडेलवाल, मुस्लीम समाजाचे अब्बास खान, जाबिर शेख, मुस्ताफ काटेवाडी, शकिल शेख, अ‍ॅड. अश्पाक काझी, फिरोज बागवान, आरपीआय अल्पसंख्याक सेलचे मावळ तालुकाध्यक्ष तुपेलभाई शेख, नगरसेवक गिरीश कांबळे, संजय गायकवाड, महंमद मण्यार, सलिम मण्यार यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.