मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपा-शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. शनिवारी मतमोजणी झाली. २१ पैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला ११ तर भाजपा-शिवसेनेला ७ जागा मिळाल्या.मुंबई महापालिकेची एक जागा शिवसेनेने कायम राखली. राज्यात राष्ट्रवादीला ६, काँग्रेसला ५, भाजपाला५ तर शिवसेनेला २ जागांवर समाधान मानावे लागले. नाशिकमधून मनसेने व कुडाळमधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, तसेच धुळ्यातून अपक्षाने प्रत्येकी १ जागा मिळविली.पोटनिवडणुकीत सेनेचे रामदास कांबळे विजयीमुंबई : महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला उमेदवारी देऊन, प्रतीक्षानगर प्रभाग क्रमांक १७३ खेचून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अखेर तोकडा पडला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील शेट्ये यांनी कडवी झुंज दिल्याने शिवसेनेचे रामदास कांबळे अवघ्या ८४५ मतांनी विजयी झाले.पक्षनिहाय निकालमहापालिकाराष्ट्रवादी : पुणे, उल्हासनगर,काँग्रेस : सोलापूर, अहमदनगर,भाजपा : जळगाव (बिनविरोध)शिवसेना : मुंबई । मनसे : नाशिकएकूण जागा : ७ । राष्ट्रवादी २,काँग्रेस २, भाजपा १, शिवसेना १, मनसे १
युतीपेक्षा आघाडी सरस; २१ पैकी ११ जागा, स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 6:11 AM