शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 6:13 AM

MVA Maharashtra Politics: जागावाटपाआधीच लहान कोण, मोठा कोण, यावरून वादाचे सूर. मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात करण्याआधीच आता महाविकास आघाडीत नवीन ‘भाऊ’बंदकी सुरू झाली आहे. लहान भाऊ कोण अन् मोठा भाऊ कोण यावरून वादाचे सूर निघू लागले आहेत. काँग्रेसने तर लहान-मोठे जाऊ द्या, राष्ट्रवादीचा जन्मच आमच्या उदरातून झाला असल्याचा टोला लगावला आहे. 

मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान-मोठ्याचा फैसला निवडणुकीत होईल. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावाने मते मागणारे खासदार सत्तेसाठी फुटले असले तरी आम शिवसैनिक व त्यांची संपूर्ण सहानुभूती, विश्वास हा उद्धव ठाकरेंवरच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते ॲड.अनिल परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

भाजपकडून चाचपणीमविआचे जागावाटप आजच केले तर नाराज झालेल्या पक्षांचे इच्छुक उमेदवार भाजपच्या गळाला लागू शकतात अशी भीतीदेखील आहे. भाजपने असे नाराज कोण असू शकतील व त्यांना आपल्याकडे कसे ओढता येईल याची चाचपणी सुरू केली आहे. अशा नाराजांना लोकसभेची उमेदवारी देणे शक्य नसेल तर विधानसभेचे गाजर दाखवून भाजप जवळ करेल असे मानले जाते.

चर्चा आतापासूनच सुरू करण्यावर मतभेद! n महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि विधानसभा निवडणुकीला दीड वर्षे बाकी असताना करण्यावरून मविआत मतमतांतरे असल्याचे म्हटले जाते. n एक-दीड महिन्यातच जागावाटप ठरले तर भाजपला रणनीती आखणे सोपे जाईल. त्यापेक्षा नोव्हेंबरच्या आसपास फॉर्म्युला ठरवावा असाही एक मतप्रवाह आहे.

७५:२५ चा फॉर्म्युला?महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व काँग्रेसने ३६ ते ३८ जागा लढवाव्यात आणि ठाकरे गटाने १२ ते १४ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव काँग्रेस व राष्ट्रवादीकडून दिला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला ७५ ते ७८ टक्के जागा व ठाकरे गटाला २२ ते २५ टक्के जागा असे वाटप केले जाऊ शकते. अर्थात ठाकरे गटाला ते मान्य होणार नाही असे सध्याच्या त्यांच्या पवित्र्यावरून दिसते.

ठाकरेंची ती ताकद आहे?शिवसेनेने २०१९ मध्ये १८ जागा जिंकल्या पण आज त्यांच्याकडे पाचच खासदार आहेत. आता त्यांना १८ ते २० जागा कशा द्यायच्या?, असा सवाल राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.

महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आहे? कोण लहान भाऊ आहे?, हे पाहण्यासाठी आता डीएनए टेस्ट करावी लागेल. अजित पवार काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतो, याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आमचे १८ खासदार जिंकले होते. आमचा तो आकडा कायम राहीलच.      - खा.संजय राऊत,     शिवसेना (ठाकरे गट) नेते

२०१९नुसार जागा वाटप योग्य नाही. भाजपला कोणता पक्ष व कोणता उमेदवार पराभूत करू शकतो ते महत्त्वाचे आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा त्या आधारे ठरला पाहिजे. छोटा भाऊ, मोठा भाऊ हा विषय जाऊ द्या. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या उदरातून झाला आहे.     - अतुल लोंढे,     काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते

नाकचुलत म्हणाला-‘थोरला आहे’सावत्र म्हणाला-‘धाकटा आहे’मावस म्हणाला-‘एकटा आहे’कर्नाटक म्हणालं-‘मोळी सुटली तर प्रत्येक जण नकटा आहे’    - रामदास फुटाणे

२०१९ मध्ये काय होती स्थिती? पक्ष    जागा     जागा    मिळाली     मतांची    लढवल्या    जिंकल्या    मते    टक्केवारी भाजप     २५    २३    १४९१२१२३    २७.८४ शिवसेना    २३    १८    १२५८९०६४    २३.५ राष्ट्रवादी    १९    ०४    ८३८७३६३    १५.६६ काँग्रेस    २५    ०१    ८७९२२३७    १६.४१

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस