मविआ की भाजपा? राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास कोण बाजी मारणार, सर्व्हेमधून समोर आला धक्कादायक कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:31 PM2021-11-26T20:31:51+5:302021-11-26T20:46:45+5:30

Maharashtra Opinion Poll: अनेक आरोप आणि कारभारामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले. त्या पार्श्वभूमीवर आज निवडणुका झाल्यास राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळेल याचा अंदाज घेणारा सर्वे समोर आला आहे. 

MVA or BJP? If the state assembly elections are held today, who will win, a shocking trend has emerged from the survey | मविआ की भाजपा? राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास कोण बाजी मारणार, सर्व्हेमधून समोर आला धक्कादायक कल

मविआ की भाजपा? राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास कोण बाजी मारणार, सर्व्हेमधून समोर आला धक्कादायक कल

Next

मुंबई - अनेक नाट्यमय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा जाहीक केल्या, मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पडले नाही. दरम्यान, अनेक आरोप आणि कारभारामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले. त्या पार्श्वभूमीवर आज निवडणुका झाल्यास राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळेल याचा अंदाज घेणारा सर्वे समोर आला आहे.

साम टीव्हीने केलेल्या या सर्वेनुसार राज्यात आज निवडणूक झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सत्तेत कायम राहणार आहे. तर भाजपाला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या तिन्ही पक्षांना मिळून १७८ जागा मिळतील. तर भाजपालाही मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, भाजपाला १०१ एवढ्या जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात ९ जागा जातील. 

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील. तर सर्व पक्षांची स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही भाजपाच्या जागा १०४ च्या आसपास राहण्याची शक्यता या सर्वेमधून व्यक्त करण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये ७ जागा जातील. 

तसेच सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजपाला २७.९ टक्के मते मिळतील. शिवसेनेला २४ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २१.४ टक्के मिळतील. तसेच काँग्रेसला १४.२ टक्के मते मिळतील. तर मनसेला २.९ आणि वंचितला २.५ टक्के मते मिळतील. तसेच महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास महाविकास आघाडीला ३९.८ टक्के मते मिळतील. मात्र काँग्रेसविना महाविकास आघाडी झाल्यास त्यांना १९.८ मते मिळतील. तर भाजपाा २७.५ टक्के मते मिळती. 

Web Title: MVA or BJP? If the state assembly elections are held today, who will win, a shocking trend has emerged from the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.