केंद्रशासनाच्या योजनांमध्ये केंद्रीय रेशीम मंडळाच्या विविध योजना, कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय योजनेमध्ये शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी जिल्हा कार्यालयाच्या वतीने मोफत बेणे पुरवठा केला जातो. ७५ टक्के अनुदानाची रक्कम संचालनालयामार्फत दिली जाते. शेतकऱ्यांकडून २५ टक्के रक्कम अंडीपुजापोटी घेतली जाते.
तुती लागवड केल्यानंतर शेतकऱ्यास कार्यालयामार्फत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते व त्या दरम्यान प्रशिक्षण भत्ता व विद्यावेतन म्हणून रु. ७५०- दिले जाते. कौशल्य विकास साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना संचालनालयामार्फत राज्यातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. रोहयोतंर्गत १ हेक्टरपर्यंत तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना प्रतिएकर क्षेत्रास २० हजार अनुदान दिले जाते. यापैकी पहिल्या वर्षी ६ हजार रोजमजुरी व ८ हजार साहित्य स्वरूपात अनुदान देण्यात येते. दुसऱ्या वर्षी मजुरी ३ हजार व तिसऱ्या वर्षी ३ हजार अनुदान दिले जाते.