शासकीय रोपवाटिका बळकटीकरणाचे शासनाचे धोरण आहे. ज्या भागात फळबागा लागवडीचे क्षेत्र आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना जवळच्या रोपवाटिकेवरून दर्जेदार कलमे-रोपे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रोपवाटिकांचे बळकटीकरण योजना आणलेली आहे.
या योजनेद्वारे रोपवाटिकांच्या सीमा भिंत बांधणे, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे तयार करणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करून घेणे, पॉलीहाऊस, शेडनेट, हार्डनिंग शेड, ग्रीन हाऊस इत्यादी सुविधा रोपवाटिकांसाठी उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
रोपवाटिकांमध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळपीक संशोधन केंद्र, नागपूर यांच्याकडे असलेल्या रोपवाटिकांप्रमाणे सुविधा इतर रोपवाटिकांमध्ये उपलब्ध कराव्यात. रोपवाटिकांवर उपलब्ध असलेल्या मातृवृक्षामध्ये नवीन व सुधारित जातीच्या विविध फळझाडांच्या मातृवृक्षाची लागवड करणे, रोपवाटिकांच्या यांत्रिक सुविधांमध्ये वाढ करणे, शासकीय रोपवाटिकेवर किरकोळ स्वरूपाची विकासकामे करणे व त्यांची दुरुस्ती करणे आदींचा आहे.