गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षांच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे.
राज्यात शेतकऱ्यांची कमी होत चाललेली जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसेच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार करून समूह शेतीला चालना देण्यात यावी या विचाराने ही योजना तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी संघटन करून उत्पादन आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे. शेतीची उत्पादकता वाढवणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
या योजनेद्वारे शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समूहापर्यंत पोहोचवण्यात येईल. शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यालाही चालना मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृषिपूरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.